BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हो सकता’ – सुधीर मुनगंटीवार

अवनी वाघीण हत्या प्रकरण

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – अवनी वाघीण नरभक्षक झाली होती. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसारच तिचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे कोणतेही उल्लंघन झाले नाही. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हो सकता असे सांगत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचा राजीनामा मागणा-यांना सडेतोड उत्तर दिले. तसेच माझा राजीनामा मनेका गांधी नव्हे भाजप अध्यक्ष अमित शहा मागू शकतात. इतर कोणालाही राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले.

पिंपरीतील एच. ए मैदानावर असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट हॉर्टीकल्चर असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय फुलांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज (गुरुवारी) त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

‘सच सच होता आहे’ असे सांगत मुनगंटीवार म्हणाले, माझे वनखाते काढून घेण्याची मागणी कोणी केली नाही. अशी मागणी केल्याने माझे खाते राहत नाही आणि प्रमोशन मिळत नाही. माझा राजीनामे पक्षाचे अध्यक्षच मागू शकतात. त्यांनी ठरविल्यावरच यावर निर्णय होईल.

मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना मुनगंटीवार म्हणाले, निवडणुकीत मते मिळावीत. सत्तेचे रक्षण व्हावे. यासाठी आरक्षण देण्याची सरकारची भुमिका नाही. समाजामध्ये ज्या जाती-धर्मांना मुख्य प्रवाहापर्यंत पोहचविण्यासाठी त्या सर्वांना आरक्षण दिले पाहिजे, ही भुमिका सरकारने घेतली आहे. निवडणुकीचा या आरक्षणाशी दुरपर्यंतचा संबंध नाही. मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकावे. आरक्षण दिल्यानंतर या निर्णयाच्या प्रती न्यायालयाने विरोधी भुमिका घेऊ नये. यासाठी अतिशय तर्कशास्त्राच्या आधारावर आरक्षणाची भुमिका सरकार घेत आहे.

सरकारची नियत, निती साफ आहे. जेव्हा नियत साफ आहे. तेव्हा हे आरक्षण न्यायालयात सुद्धा टिकेल. तसेच आरक्षणाच्या लाईनमध्ये जो समाज उभा आहे. ज्यांना आरक्षणाची गरज आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता देखील सरकार घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A4

.