Wakad : विवाहितेला तलवारीने कापण्याची धमकी देत माहेरहून पैसे आणण्याची मागणी

सासरच्या मंडळीं विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा

एमपीसी न्यूज – दुकान सुरु करण्यासाठी माहेरहून पैसे आण. पैसे आणले नाही तर तलवारीने कापून टाकीन, अशी धमकी देत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार कुलकर्णी बाग नाशिक येथे घडला.

याप्रकरणी 25 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती, सासरा, सासू आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला नाशिक येथे सासरी नांदत असताना सासरच्या मंडळींनी तिला किरकोळ कारणावरून मानसिक व शारीरिक त्रास दिला. आई वडिलांकडून दुकान सुरु करण्यासाठी पैसे घेऊन ये, अशी मागणी केली. जर पैसे घेऊन आली नाही तर तलवारीने कापून टाकीन अशी धमकी दिली. तसेच आमच्या आमदार, खासदार ओळखीचे आहेत, असा दम देखील दिला. विवाहितेच्या आई-वडिलांनी त्यांच्या विवाहामध्ये दिलेली दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, सोन्याची नथ असे स्त्रीधन काढून घेतले. यावरून पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस फौजदार ए ए मोमीन तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.