Pimpri: आदित्य बिर्ला रुग्णालयावर कारवाई करा, महापौरांचे आयुक्तांना आदेश

Take action against Aditya Birla Hospital, Mayor orders Commissioner;नगरसेवकांनीही आज महासभेत बिर्ला रुग्णालयांच्या विरोधात तक्रारी केल्या

एमपीसी न्यूज – चिंचवडच्या आदित्य बिर्ला रूग्णालयांसंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या रूग्णालयावर कारवाई करावी, असे आदेश महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत.

पिंपरी पालिकेची प्रथमच आज (सोमवारी) ऑनलाईन सभा आयोजित केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या.

राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे 4 जुलैला कोरोनामुळे आदित्य बिर्ला रुग्णालयात निधन झाले आहे. बिर्ला रुग्णालयावर विविध आरोप केले जात आहे.

नगरसेवकांनीही आज महासभेत आदित्य बिर्ला रुग्णालयांच्या विरोधात तक्रारी केल्या. बिलाची आकारणी जादा केली जात आहे. त्यांच्या बिलांची तपासणी करण्यात यावी. रुग्णांची हेळसांड केली जाते, असे विविध आरोप रुग्णालय प्रशासनावर केले.

नगरसेवकांनी तक्रारींचा भडीमार केला. त्यावर महापौर उषा ढोरे यांनी चिंचवडच्या आदित्य बिर्ला रूग्णालयांसंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या रूग्णालयावर कारवाई करावी, असे आदेश  आयुक्तांना दिले.

तसेच कोरोनाबाधित नगरसेवकांना चांगले उपचार केले जावेत. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी, असाही आदेश महापौरांनी आयुक्तांना दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.