Pimpri : भर दिवसा लॅपटॉपसह दुचाकी चोरीला

The bike was stolen along with the laptop all day

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप आणि दुचाकी चोरून नेली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 26) दुपारी एक वाजताच्या सुमारास स्वप्ननगरी सोसायटी, उद्यमनगर, पिंपरी येथे घडला.

याप्रकरणी  कमल राजेंद्रप्रसाद गुप्ता (वय 37, रा. स्वप्ननगरी सोसायटी, उद्यमनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास फिर्यादी यांनी त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेली 25 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एमएच 14 / आर 1457) उद्यमनगर पिंपरी येथील स्वप्ननगरी सोसायटीमध्ये शशी मेडिकलसमोर पार्क केली.

दुचाकीच्या डिक्कीमध्ये फिर्यादी यांचा 20 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप होता. अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉपसह दुचाकी चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे सत्र मागील काही दिवसांपासून जोरात सुरु आहे. दररोज वाहन चोरीच्या घटना सामोर येत आहेत. हे वाहन चोरटे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जात आहेत. यामुळे शहरातील वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.