Pimpri : अण्णा भाऊ साठेनगर वसाहतीमधील मूलभूत समस्या सोडविण्याची ‘अपना वतन’ची मागणी

एमपीसी न्यूज – अण्णा भाऊ साठेनगर वसाहतीमधील आरोग्य, कचरा वाहतूक, घंटागाडी, गटार, ड्रेनेज, स्ट्रीटलाईट पोल यांसारख्या मूलभूत समस्यांवर तातडीने उपाय योजना करण्यात यावी, अशी मागणी अपना वतन संघटनेने आयुक्तांकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, वाकडमधील प्रभाग क्रमांक 26 अण्णा भाऊ साठेनगर, येथे रविवारी सकाळी अपना वतन संघटनेच्या वतीने संपूर्ण परिसर पाहणी करण्यात आली. त्यावेळी तेथील स्थानिक नागरिकांशी संवाद करण्यात आला. तेथील नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या. अण्णा भाऊ साठेनगरमध्ये कचरा नेहण्यासाठी घंटागाडी येत नाही. त्यामुळे कचरा इतरत्र टाकतात. परिणामी दुर्गंधी निर्माण होते.

  • अण्णा भाऊ साठेनगर आणि टेलिफोन वसाहत यांच्यासाठी असलेली कचराकुंडी कचरा फुल्ल असते. तो कचरा 8-10 दिवस उचलला जात नाही. उलट बाहेरचा कचरा त्या कुंडीत आणून टाकला जातो. कचरा वाहतूक विभागाचे अधिकारी गाडी उपलब्ध नसल्यची करणे देतात. त्यामुळे कचरा रस्त्यावर दुर्गंधी पसरते . या परिसरामध्ये डुक्करांची संख्या मोठ्या प्रमाणवर आहे.

याबाबत सुद्धा पशुवैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अण्णा भाऊ साठेनगरमध्ये स्वछ भारत अभियानांतर्गत स्वछतागृह बांधण्यात आली. त्याचे अनुदान प्रत्यक्ष लाभार्थीला न ठेकेदारनमार्फत ते स्वछतागृहे बांधण्यात आली. ती सुद्धा अनुदानाच्या तुलनेत अतिशय निकृष्ट दर्जाची बांधलेली आहेत. या कामामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणवर भ्रष्टचार झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी.

  • येथील नागरिकांना दूषित आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्याबाबत तातडीने उपाययोजना करावी. स्मार्ट सिटी असणाऱ्या आपल्या महापालिका हद्दीमध्ये मोठ्या संख्येने राहणाऱ्या वस्तीकडे पालिका प्रशासनचे तसेच लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून त्याना अतिशय हीन दर्जाची वागवणूक दिली जात आहे.

वरील सर्व समस्यांबाबत पुढील 10 दिवसांमध्ये बैठक घेऊन तोडगा काढावा. अन्यथा, अपना वतन संघटनेच्या वतीने अण्णा भाऊ साठे नगरमधील नागरिकांच्या सोबत दि. 29 जून रोजी सकाळी 11.00 वाजता ‘ड’ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनविरोधात जन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.