Pimpri: ‘एमपीसी न्यूज’च्या कार्यालयात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना

एमपीसी न्यूज – भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या मुहूर्तावर आज (सोमवारी) देशभरात लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. ‘एमपीसी न्यूज’च्या पिंपरीतील कार्यालयात देखील मोठ्या भक्तीमय वातावरणात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

चैतन्याची लयलुट करणा-या श्री गणेशाची आज ब्राह्म मुहुर्तापासून विधीवत पूजन करुन उत्साहात स्वागत करण्यात आले. 11 दिवसाच्या आनंद सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. पुढील 11 दिवस गणपती बाप्पा भक्तांच्या घरी मुक्कामी राहणार आहेत. सर्व दु:खावर मात करण्याची शक्ती देणारा आणि सर्वत्र उत्साह, चैतन्य निर्माण करणा-या गणेशाचे अबालवृद्धांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया…..अशा घोषणा देत आणि ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाचे स्वागत झाले. ‘एमपीसी न्यूज’च्या कार्यालयात देखील दरवर्षी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते. यावर्षी देखील मोठ्या भक्तीमय वातावरणात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

यावेळी ‘एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार, कार्यकारी संपादक ऋषीकेश तपशाळकर, सहयोगी संपादक अनिल कातळे, सहसंपादिका स्मिता जोशी, वरिष्ठ उपसंपादक विश्वास रिसबूड, उपसंपादिका स्वाती राठोड, उपसंपादक नवनीत कांबळे, वार्ताहर गणेश यादव, किरण शिंदे, श्रीपाद शिंदे, लीना माने, छायाचित्रकार अमोल वाजगे, समीर पाटील, प्रवीण ताव्हारे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.