BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : कारच्या धडकेत दुचाकीस्वारचा मृत्यू; दोघे गंभीर, कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि. 1) पहाटे बावधन येथे झाला.

आकाश साळुंके (रा. खडकमाळ, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, महेश मधुकर काशीद आणि राम (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी बंडू परशुराम काशीद (वय 43, रा. खडकमाळ, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कारचालक रामदास सुखदेव चौगुले (वय 29, रा. थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बंडू यांचा पुतण्या आकाश हा मित्र महेश आणि राम यांना दुचाकीवर ट्रिपलसीट घेऊन जात होता. दरम्यान, ते बावधन येथील पाटील हॉटेल समोर आले असताना समोरून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये आकाशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, महेश आणि राम गंभीर जखमी झाले आहेत. हिंजवडी पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3