Pimpri : पिंपरी मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र पळवले

एमपीसी न्यूज –  पिंपरी मार्केटमध्ये खरेदीसाठी (Pimpri) आलेल्या महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने पळवले. ही घटना शनिवारी (दि. 16) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास इंडिया क्लॉथ सेंटर समोर घडली.

याप्रकरणी महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talawade : मिक्सरची दुचाकीला पाठीमागून धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शनिवारी दुपारी पिंपरी मार्केटमध्ये खरेदीसाठी आल्या होत्या. रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका हातगाडीवर त्या खरेदी करीत असताना त्यांच्या हातातील पर्स ओढल्याचा त्यांन भास झाला.

त्यांनी पर्स उघडून पाहिले असता त्यात त्यांनी ठेवलेले 34 हजार 100 रुपये किमतीचे सोन्याचे मनीमंगळसूत्र नव्हते. अज्ञात चोरट्याने त्यांच्या नकळत त्यांच्या पर्स मधून मंगळसूत्र चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.