Pimpri: महापालिका कर्मचा-यांनी घेतली ‘लोकशाही’वर निष्ठा ठेवण्याची शपथ

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आज (शुक्रवारी) सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेतली.

राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार आज महापालिकेत मतदार दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी शपथ दिली. 25 जानेवारी 2020 रोजी “राष्ट्रीय मतदार दिवस” साजरा करण्यात येणार येतो. तथापि, 25 जानेवारी रोजी दुसऱ्या शनिवार असल्याने कार्यालयास सुट्टी असल्याने शासन निर्देशानुसार आज राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.

त्याअनुषंगाने 18 वर्षे पूर्ण केलेल्या नविन तरूण मतदारांचा यादीत समावेश करणे. त्यांचा मतदान प्रकियेत सहभाग वाढविणे हा प्रमुख उद्देश आहे. या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने सर्व शाळा व शैक्षणिक संस्थामध्ये वादविवाद स्पर्धा, प्रारूप मतदान, चित्रकला स्पर्धा, क्वीझ कॉम्पीटिशन इ. स्पर्धा आयोजित करून लोकशाही व मतदाराचा सहभाग यांचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.