Pimpri: राष्ट्रवादीच्या सुलक्षणा धर, राजू बनसोडे, शेखर ओव्हाळ यांची माघार

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी शमली आहे. अपक्ष अर्ज दाखल केलेल्या नगरसेविका सुलक्षणा धर, नगरसेवक राजू बनसोडे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेविका वैशाली काळभोर, माई काटे, फजल शेख उपस्थित होते.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून बनसोडे यांच्यासह धर, राजू बनसोडे, शेखर ओव्हाळ इच्छुक होते. पक्षाने सुलक्षणा धर यांना अगोदर उमेदवारी जाहीर केली होती. परंतु, रात्री उमेदवारी बदलत अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे धर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. तसेच नगरसेवक राजू बनसोडे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी देखील बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता.

पक्षाच्या नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर तिघांनी माघार घेतली आहे. अर्ज माघार घेण्याच्या मुदतीत त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांचे मन वळविण्यात नेतृत्वाला यश आले आहे. त्यामुळे अण्णा बनसोडे यांना दिलासा मिळाला आहे.

त्यांच्यासह मित्र पक्ष काँग्रेसचे सुंदर कांबळे, मनोज कांबळे, उत्तम हिरवे, संदीपान झोंबाडे, गौरीशंकर झोंबाडे, सतिश भवाळ, विजय रंदील अशी 13 जणांनी माघार घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.