pimpri: आजपर्यंत कोरोनाच्या 243 पैकी 210 रुग्णांची चाचणी ‘निगेटिव्ह’

मागील 11 दिवसांपासून पॉझिटीव्ह रुग्ण नाही

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत 243 रुग्णांचे कोरोना तपासणीसाठी घशातील द्रावांचे नमुने ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी आजअखेर 210  व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

तसेच आज (सोमवारी) 21 संशयित रुग्ण महापालिका रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर, 12 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांपैकी नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तीन रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत. मागील 11 दिवसांपासून एकही नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही, ही समाधानाची बाब मानली जात आहे.

कोरोना पॉझिटिव्ह 4 रुग्णांपैकी नवीन भोसरी रुग्णालयातील ज्या रुग्णांचा 14 दिवसाचा कालावधी  झालेल्या  1 रुग्णाचे 24  तासातील घशातील द्रावाचे लागोपाठ दोन नमुन्याचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांना घरामध्ये 14  दिवस अलगीकरणामध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एकुण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 3 आहे.  या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर ‘आयसोलेशन’ कक्षामध्ये उपचार सुरु आहेत.

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांची संख्या 1463 आहे.  या  सर्वांनी किमान 14 दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील 28  दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे. तसेच सुचनांचे पालन न करणाऱ्या होम क्वारंटाईनमधील नागरिकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. या आदेशाचे उल्लघन करणा-यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतुद आहे.  शहरातील 5 लाख 48 हजार 627 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.