Pimpri : भागीदाराच्या फसवणूक प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – दोन भागीदारांनी त्यांच्या तिसऱ्या भागीदाराची (Pimpri) फसवणूक केली. या प्रकरणी दोन्ही भागीदारांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार 1 ऑगस्ट 2021 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत शगुन चौक, पिंपरी येथे घडला.

आयुष रमेश बजाज (वय 25, रा. पिंपरी), रमेश खूबचंद बजाज (वय 45, रा. पिंपरी) अशी अटक झालेल्या भागीदारांची नावे आहेत. याप्रकरणी सुनील दिलीप डोलवाणी (वय 32, रा. वाकड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Mahalunge : विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या कारची दुचाकीला धडक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील यांनी त्यांच्या ओळखीचे आयुष आणि रमेश यांच्यासोबत भागीदारीत मोबाईल दुकान सुरु केले. ठरल्या प्रमाणे पार्टनरशिप करार आणि कागदपत्रांचे काम आयुष आणि रमेश हे दोघेजण करणार होते.

दरम्यान फिर्यादी यांनी त्यांच्या इतर दुकानांमधून 10 लाख 96 हजार 587 रुपये मोबाईल फोन घेण्यासाठी भांडवल दिले होते. तसेच आयुष याच्या मागणीनुसार फिर्यादी यांनी दुकानाच्या भांडवलासाठी सात लाख 97 हजार 800 रुपये दिले होते. असे (Pimpri) असताना आरोपींनी फिर्यादी यांना भागीदार म्हणून कागदोपत्री नोंदवून न घेता त्यांची मालमत्ता स्वतःकडे ठेऊन तिचा न्यासभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.