Pimpri Vaccination News: ‘कोविशिल्ड’ची पुन्हा टंचाई, शनिवारी फक्त ‘कोव्हॅक्सिन’ची लस मिळणार

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लशीची पुन्हा टंचाई निर्माण झाली आहे. लशीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे उद्या (शनिवारी) पिंपरी-चिंचवड शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’ चा दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार !

स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेजनगर आणि अश्विनी मेडिकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पिटल चिंचवड या 2 केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 100 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’ची लस मिळणार आहे. कोविन अॅपवर नोंदणी करुन स्लॉट बुक केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल. उद्या सकाळी 8 नंतर कोविन ॲपवर नोंदणीसाठी स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.

45 वर्षापुढील नागरिकांना ‘या’ केंद्रांवर मिळणार लस

45 वर्षापुढील नागरिकांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप या पद्धतीने नवीन भोसरी रुग्णालय आणि पिंपळेनिलख येथील महापालिकेची इंगोले शाळा येथे 100 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.