Pimpri : जगद‍्गुरू संत तुकाराम महाराजांच्या परतीच्या पालखीचे स्वागत

एमपीसी न्यूज – संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरहून नुकतेच पिंपरीत आगमन झाले. या परतीच्या पालखीचे विठू भक्तांनी पिंपरीत उत्साहात स्वागत केले. यावेळी वारकर्‍यांना अल्पोपहार, फळवाटप करण्यात आले.

पिंपरी येथे संध्याकाळी पाच वाजता  पिंपरीत पंढरपूरहून पालखीचे आगमन झाले. यावेळी पालखी सोहळा प्रमुख  संजय मोरे व दिंडी प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. स्वागत सोहळ्याला रमेश वाघेरे, अरुण साठे, आनंद आगरवाल, महादेव गुंजाळ उपस्थित होते. यावेळी रमेश वाघेरे आणि मित्र परिवाराच्या वतीने बुंदी, बिस्किट, चहा; नाष्टा तसेच फळवाटप करण्यात आले. अर्ध्या तासाच्या विसाव्यानंतर पालखीने पिंपरी गावाकडे प्रस्थान केले. पिंपरी गावातील भैरवनाथ मंदिर येथे पालखी मुक्‍कामाला राहणार असून, उद्या सकाळी सहा वाजता चिंचवड गावाकडे मार्गस्थ होणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख संजय मोरे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.