Pimpri: संविधानाची ओळख करुन देण्यासाठी लेखी परीक्षा उपक्रम

एमपीसी न्यूज – भारतीय संविधानाची ओळख करुन देण्यासाठी विद्यार्थी आणि तरुणांसाठी संविधानावर आधारित प्रश्‍नांची लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक दिले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समता सैनिक दलाच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे.

या उपक्रमांतर्गत भारतीय संविधानातील कलम12 ते 35 मधीलमुलभूत अधिकार आणि कर्तव्ये यांच्यावर आधारित लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यामधील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला रोख पाच हजार रुपये, तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार आणि दोन हजारांचे रोख पारितोषिक , प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.

_MPC_DIR_MPU_II
  • येथे होणार परीक्षा
    येत्या 28 एप्रिलपर्यंत शहर व परिसरातील विविध ठिकाणी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी (दि.26) दुपारी पावणे दोन वाजता चिंचवडगावातील आलमगीर शाही मशिदीत ही परीक्षा होईल. त्यानंतर रविवारी (दि.28) सकाळी अकरा वाजता पिंपरी स्टेशनजवळील आवर लेडी चर्च आणि नेहरूनगरमधील तवकल्ला जामा मशिदीत मध्ये सकाळी अकरा वाजता ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

परीक्षेसाठी येथे संपर्क साधा
याचदिवशी सायंकाळी साडे चार वाजता आळंदीतील प्रदक्षणा मार्गावरील संत निळोबाराया धर्मशाळेत ही परीक्षा होणार आहे. यापुर्वी पिंपरी कॅम्पातील गुरुनानक दरबार येथे ही परीक्षा घेण्यात आली आहे. या स्पर्धेत नावनोंदणी मोफत असून, सहभाग नोंदविण्याकरिता 9028205205 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.