PCMC News : संविधान दिनानिमित्त विविध प्रबोधनपर उपक्रम – अतिरिक्त आयुक्त जगताप

एमपीसी न्यूज – संविधानाचा विचार तळागळातील (PCMC News) लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संविधान दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने विविध प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी या उपक्रमांमध्ये उत्स्पुर्त सहभाग घेऊन संविधान साक्षर व्हावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.  

भारतीय संविधान दिनानिमित्त संविधानाची जनजागृती करण्यासाठी आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी  महापालिकेच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे अयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवारी) नियोजन बैठक पार पडली.

यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहीवाल, कार्यकारी अभियंता संजय घुबे, उप अभियंता अभिमान भोसले, विजय कांबळे, कामगार नेते तुकाराम गायकवाड, गणेश भोसले, माजी नगरसदस्य मारुती भापकर, अॅड. गोरक्ष लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर वारभुवन, देवेंद्र तायडे, फादर अमृत फोन्सेका, सुप्रिया सोळांकूरे, भाऊसाहेब अडागळे, उत्तम कांबळे, बापूसाहेब गायकवाड, संदीपान झोंबाडे, अॅड.विद्या शिंदे, संतोष जोगदंड, राम भंडारे, धम्मराज साळवे, प्रकाश बुक्तर, संतोष शिंदे, मुकुंद रणदिवे,  रोहिणी रासकर, दिपाली लोंढे, युवराज भास्कर, विजय गायकवाड, आनंदा कुदळे, सागर येल्लाळे, शंकर लोंढे, धीरज वानखेडे, राहुल शिंदे, गिरीश साबळे, सतीश काळे, कृष्णा जाधव, दत्ता गायकवाड, प्रशांत मागाडे, राघु बनसोडे, विजय उलपे, बाळू निकाळजे, पांडुरंग महाजन, इंदुताई घनवट, शशिकांत मोरे, मनोज गायकवाड, राज वैभव शोभा, शीतल यशोधरा, अजय गायकवाड,शिवाजी खडसे, नकुल भोईर, अभिषेक म्हसे, प्रकाश जाधव, टी.डी.ढेकळे आदींसह जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे, प्रफुल्ल पुराणिक, विनोद सकट यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Disha : पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या पुढाकाराने झोपडपट्टी भागातील बालकांना मिळणार ‘दिशा’

यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणे तसेच त्याअनुषंगिक चर्चा करण्यात (PCMC News) आली. उपस्थितांनी यावेळी विविध सूचना केल्या. यामध्ये संविधानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी  संविधान संमेलनाचे आयोजन करावे, संविधान संवाद रथ तयार करून रुंद, अरुंद रस्त्यांवरून फिरवून नागरिकांमध्ये संविधानाच्या मुल्यांचा जागर करावा, महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या साहित्यावर आधारित व्याख्यान आयोजित करावे, त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करावे, संविधानपर प्रबोधन करताना सोप्या भाषेचा वापर करावा, संविधान जनजागृतीसाठी कार्यशाळेचे आयोजन करावे, संविधानावर आधारित व्याख्यान, संगीतमय प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करावे, संविधानावर आधारित राज्यस्तरीय निबंध आणि भाषण स्पर्धा आयोजित कराव्यात,  विविध प्रबोधनपर कार्यक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध माध्यमातून जाहिरात करावी, उद्योजक मेळावा आयोजित करावा, नव उद्योजक घडवण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करावे.

शाळा, महाविद्यालयांच्या स्तरावर संविधान दिन साजरा करण्याबाबत आवाहन करावे, प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे, महापालिकेच्या वतीने संविधान भवन उभारण्यात यावे, अशा सूचना उपस्थितांनी बैठकीत  मांडल्या. उपस्थित नागरिकांकडून करण्यात आलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करून कार्यक्रमांचे योग्य नियोजन करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त जगताप म्हणाले, भारतीय संविधानाबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करत असताना केंद्र, राज्य, आणि महापालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी संस्था, संघटनाच्या प्रतिनिधींनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.