Talegaon-chakan : तळेगाव चाकण महामार्गावरील वाहतूक समस्या आणि रखडलेल्या रस्ते कामाविरोधात ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज- तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548-डी घोषित होऊन जवळपास 5 वर्षे उलटली तरीही या महामार्गाचे काम लाल फितीत अडकले आहे. अपघात आणि वाहतूक कोंडीच्या समस्येपासून नागरिकांना दिलासा मिळावा व वाहतूक विभागाच्या अनास्थेमुळे महामार्गावरील अपघातांत दिवसेंदिवस झालेली वाढ या विरोधात दि.13 रोजी सकाळी दहा वाजता तळेगाव-चाकण महामार्गावरील मराठा क्रांती चौक महामार्ग कृती समिती व जनसेवा विकास समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन व अपघातात मृत्युमुखी पडलेल्या जीवांसाठी  शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान या मार्गावरील रोजची रहदारी आणि वाहन संख्या पाहता रस्ता खूपच अपुरा आणि अरुंद आहे.रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून गेल्या पाच वर्षांत तब्बल 254 बळी गेले आहेत.दैनंदिन वाहतूक कोंडीमुळे आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी तसेच औद्योगिक क्षेत्रातील दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. अगदी राजकीय नेते देखील या वाहतूक कोंडीतून सुटलेले नाहीत. राजकीय इच्छाशक्ती अभावी अद्याप या राष्ट्रीय महामार्गाच्या या कामास प्रारंभ होऊ शकलेला नाही.

Pradeep Tapkir : प्रदिप तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी रंगणार ‘न्यू होम मिनिस्टर’; दुचाकीसह विविध बक्षीसे

वाढते अपघात आणि कोंडी टाळण्यासाठी सकाळी आठ ते सायंकाळी आठ पर्यंत तळेगाव दाभाडे मार्गे चाकणकडे ये जा करण्यास अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. (Talegaon-chakan)परंतु खुद्द वाहतूक शाखेनेच ही नो एंट्री धाब्यावर  बसवून वसूली चालू केल्याने ती प्रवेशबंदी नामधारी उरली आहे अशी खंत कृती समिती कडून व्यक्त होत आहे.मंगळवारी (ता.08) सायंकाळी पाचच्या दरम्यान अवजड ट्रकने दुचाकीला धक्का दिल्याने मावळ तालुका आरोग्य  संघटनेच्या अध्यक्ष यांचा  मृत्यू झालेला.याचे गांभीर्य तळेगाव,वडगाव मावळ वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिका-यांना दिसत नसून त्यामुळे  नागरिकांच्या भावना आता अनावर झाल्या आहेत व गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलने करून न्याय मिळत नसल्याने आता जहाल मताने तीव्र आंदोलन करणार आहोत असे कृती समितीने निवेदनात म्हंटले आहे.

पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाहतूक शाखेच्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईकरून अवजड वाहन प्रवेश बंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी, अथवा पर्यायी मार्ग म्हणून सर्व अवजड वाहतूक वडगाव पासून तळेगाव एमआयडीसी (Talegaon-chakan) मार्गे चाकण कडे वळवावी ही विनंती कृती समितीच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान असे लेखी निवेदन पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड व मुख्य अभियंता राष्ट्रीय  महामार्ग   विभाग यांच्याकडे तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीने दिलेआहे व या आंदोलनास जनसेवा विकास समितीने पाठिंबा दर्शविला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.