Pimpri-Chinchwad Fire : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आज दोन आगीच्या घटना

एमपीसी न्यूज  पिंपरी-चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad Fire) आज शुक्रवार 11 नोव्हेंबर रोजी दोन आगीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही किंवा कोणतीही जीवित हानी झाली नाही.

पहिली आगीची घटना आज दुपारी 1.28 वा पिंपरी मधील अजमेरा कॉलनी मध्ये झाली आहे. छाया हॉटेल जवळील डब्लू सेक्टर येथील ट्रान्सफॉर्मर ला आग लागली होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पिंपरी मुख्यालयातून एक अग्निशमन बंब घटनास्थळी आग विजवण्यासाठी पोहचला होता.थोड्या वेळातच ही आग विजवण्यात आली.

Talegaon-chakan : तळेगाव चाकण महामार्गावरील वाहतूक समस्या आणि रखडलेल्या रस्ते कामाविरोधात ठिय्या आंदोलन

दुसरी आगीची घटना आज दुपारी 2.38 वा मोशी येथील बोऱ्हाडे वाडी मध्ये घडली आहे. घराबाहेर ठेवलेल्या वयरनच्या ढिगार्‍याला आग लागली होती.(Pimpri-Chinchwad Fire) अग्निशमन विभागाच्या चिखली स्थानकाचा एक अग्निशमन बंब घटनास्थळी आग विजवण्यासाठी पोहोचला होता. अंदाजे 30 मिनिटात आग विजवण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.