Pimpri : फेरफटका मारण्यासाठी आलेल्या तरुणावर कोयत्याने वार

The young man who came to take a tour was stabbed

एमपीसी न्यूज – फेरफटका मारण्यासाठी आलेल्या एका तरुणावर एकाने कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 16) रात्री पिंपरी येथे घडली.

निकेत भगवानदास बहादूर (वय 28, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.  याप्रकरणी त्यांनी बुधवारी (दि. 16) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.  राजू शेट्टी (वय 36, रा. सुभाषघाट, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निकेत आणि त्यांचा मित्र बाबा गोऱ्या हे दोघेजण फेरफटका मारण्यासाठी आले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी राजू शेट्टी याने बाबा गोऱ्या याला ‘इकडे काय करतोस’, अशी विचारणा केली.

यावेळी फिर्यादी निकेत यांनी फेरफटका मारण्यासाठी आलो आहे, असे सांगितले.

या कारणावरून संतापलेल्या राजू शेट्टी याने ‘तेरे को आज मै मार डालुंगा’ असे म्हणत दुचाकीमध्ये लपविलेला कोयता आणून निकेत यांच्यावर वार केले. निकेत यांच्या डाव्या खांद्यावर गंभीर दुखापत झाली आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.