Pimpri : पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 23) सकाळी नऊच्या सुमारास काळभोर नगर येथील स्टार बाजार समोर करण्यात आली.

अमीन अब्बीर शेख (वय 27, रा. डब्ल्यू एक्स, रूम नंबर तीन, श्रमिक नगर ओटास्किम, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई नामदेव शिवाजी राऊत (वय 30) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळभोर नगर येथील स्टार बाजारसमोर एका तरुणाजवळ देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी पोलिसांनी परिसरात सापळा रचून शेख याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे असा ऐवज आढळून आला. त्यावरून त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एकूण 76 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.