Pimpri: महापौर- आयुक्तांनी केली शहरातील नालेसफाईची पाहणी

Mayor- Commissioner inspected the sanitation in the city

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पावसाळ्यापूर्व कामाचा आढावा घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (बुधवारी) शहरातील नाल्यांची पाहणी केली आहे. पावसाळ्यामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरांमध्ये नाल्याचे पाणी जाणार नाही याची काळजी घेण्यात यावी. त्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना महापौर, आयुक्तांनी संबंधितांना दिल्या.

महापालिकेच्या वतीने पावसाच्या आगमनापूर्वी शहरातील नाल्यांच्या साफसफाई संदर्भात तीन दिवसीय मान्सूनपुर्व पुरनियंत्रण प्रभाग दौ-याचा प्रारंभ आज (बुधवार) पासून सुरु झाला.

या दौ-याची सुरुवात निगडी येथील महाराणा प्रताप गार्डन टिळक चौक येथून झाली. महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी पाहणी केली.

पावसामुळे शहरातील होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच पूरस्थितीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्याकरीता पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा यावेळी घेण्यात आला.

पावसाळा सुरु होण्यापूर्वी शहरातील नाल्यांची स्वच्छता होणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आवश्यक ती दक्षता घेण्यात येते.

ज्या ठिकाणी नाल्यांची साफसफाई अपूर्ण आहे, त्या ठिकाणांची साफसफाई त्वरीत करण्यात यावी. तसेच ड्रेनेज व पाणी पुरवठा विभागाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना संबधीत विभागाच्या अधिका-यांना दिल्या.

अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या एक्साईड इंडस्ट्रीज एमआयडीसी चिंचवड, मिल्कमेड बेकरीजवळ एमआयडीसी चिंचवड, बालाजी पेट्रोल पंपाजवळ वाहतूकनगर निगडी, एस.के.एफ कंपनी जवळ चिंचवड येथील नाल्यांची पाहणी केली.

तसेच प्राधिकरण सेक्टर नं. 26  येथील गणेश तलावाची देखील पाहणी केली. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या लक्ष्मीनगर माणिक कॉलनी, प्रेमलोक पार्क एस.के.एफ. कंपनी जवळ व आकुर्डी रेल्वे स्टेशन रोड येथील नाल्यांची पाहणी केली.

तसेच ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या महाराणा प्रतापसिंह पुतळा, माता अमृतामय विद्यालय, शनिमंदिर सी.डी.सी.वर्क, घरकुल आतील चौक वॉटर लॉगिग ठिकाण येथील नाल्यांची पाहणी केली.

अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, नगरसदस्य एकनाथ पवार, संजय नेवाळे, राजेंद्र गावडे, मोरेश्वर भोंडवे, विठ्ठल भोईर, अमित गावडे, सचिन चिंचवडे, सुरेश भोईर, नगरसदस्या सुमन पवळे, कमल घोलप, वैशाली काळभोर, अपर्णा डोके, शैलजा मोरे, अश्विनी चिंचवडे, संगीता भोंडवे, प्रज्ञा खानोलकर, अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, आशादेवी दुरगुडे, रेखा गाडेकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.