PM Care For Children : कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांना मासिक वेतन, मोफत शिक्षण व इतर सुविधा

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीत अनाथ झालेल्या मुलांसाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. कोविड काळात दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांना ‘पीएम-केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेंतर्गत आर्थिक मदत करण्यात येणार आहे. अनाथ मुलांना 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मासिक वेतन मिळणार आहे. तर 23 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत घोषणा केली आहे.

कोविडमुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी विनामूल्य शिक्षण दिले जाणार आहे. तसेच मुलांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यात मदत केली जाणार असून अशा कर्जावरील व्याज पंतप्रधान मदत निधीतून दिले जाणार आहे. अशा मुलांचा 18 वर्षांपर्यंत 5 लाखांचा आरोग्य विमा आयुष्मान भारत अंतर्गत काढण्यात येणार आहे. या विम्याचा हप्ता पीएम केअरद्वारे भरला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान कार्यलयातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.