Pimpri Corona News : कोरोनामुळे पालकांचे छत्र हरपलेल्यांची माहिती द्या; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांची माहिती आपल्या प्रभागातील समूह संघटकाकडे अथवा a.bodade @pcmcindia.gov.in or [email protected] देवून सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड  महापालिकेने केले आहे.

कोरोनाने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची तपशिलवार माहिती समन्वयक अधिका-यांस उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच कोविड रुग्ण रुग्णालयात दाखल होते वेळी आपल्या बालकाचा ताबा कोणाकडे द्यावा, ती माहिती रुग्णालयाकडून भरुन घेण्यात यावी.

‘चाईल्ड हेल्पलाइन 1068 ’ बाबतचे माहितीफलक रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात यावेत. शहरातील बालगृहे, निरीक्षणगृहातील बालकांकरीता तत्काळ उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करण्याच्या सूचना प्रभारी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिल्या आहेत.

कोविड- 19 आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची माहिती महापालिका संकलित करत आहे. कोरोनामुळे आई आणि वडिल गमावलेल्या बालकांची माहिती देण्यासाठी महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनच्या 8888006666 या क्रमांकावर किंवा महाराष्ट्र शासनाच्या चाईल्ड हेल्पलाइनच्या 1098 या क्रमांकावरही देता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.