PMC : हिल व्ह्यू ते वेस्ट विंड सोसायटीच्या मुख्य ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 32 वारजे – माळवाडी (PMC) येथे माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांच्या प्रयत्नातून हिल व्ह्यू सोसायटी ते वेस्ट विंड सोसायटी सर्व्हिस रस्त्यालगत असलेल्या मुख्य ड्रेनेज लाईन काम करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेतर्फे त्यासाठी निधी मंजूर करून घेण्यात आला आहे.

या ड्रेनेज लाइनचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्या जागेची पाहणी करण्यात आली.

यावेळी पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, महादेव गायकवाड, संतोष बोडके, सुरेश जाधव, अरुण पाटील, पुणे महापालिकेचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार उपस्थित होते.

दरम्यान, पुणे महापालिकेच्या वतीने वारजे हायवे हरिभाऊ पाटलू (PMC) चौधरी उड्डाणपूल (रोझरी स्कुल समोर) ते हिल व्ह्यू रेसिडेन्सी (घोसाळे बंधू निवासस्थान) जवळपास अडीचशे मीटर लांबीच्या चोवीस मीटर डीपी रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे.

Khed : रस्ता ओलांडणाऱ्या दाम्पत्याला वाहनाची धडक; पत्नीचा मृत्यू

यावेळी पांडुरंग पाटील, सुरेश जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. रेणुका नगर, उरीट नगर आणि शनी मंदिर मागील डीपी रस्त्यातील अडथळे लवकरच दूर होऊन लवकरच पूर्ण रस्ता नागरिकांना वापरता, येणार असल्याची माहिती बाबा धुमाळ यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.