PMC Corona Vaccination : महापालिकेकडे कोरोना लसीचा एकही डोस शिल्लक नाही

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेकडे असणारा लसीचा संपूर्ण साठा संपलं आहे. सध्या महापालिकेकडे एकही डोस शिल्लक नसून दवाखान्याकडे असलेल्या लसींवर पुढील 2 दिवस काही प्रमाणात लसीकरण होऊ शकते.

रोज 20 हजार लोकांना लस दिली जात असतानाच महपालिकेक एकही लसीचा डोस शिल्लक नाही. हॉस्पिटलकडे असणारा साठा पुढच्या दोन दिवसांत संपण्याची शक्यता असून, नव्याने दोन लाख डोस उपलब्ध होतील, असे महापालिका सांगत आहे. मात्र, पुरेसे डोस नसल्याने पुणेकरांची अडचण होण्याची शक्यता आहे.

शहरातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संपुर्ण जिल्ह्यात दररोज एक लाख लोकांचे लसीकरण केले जावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून लसीच्या साठ्यामुळे यात मोठ्या अडचणी येत आहेत. अनेक केंद्रांवर लसीकरण थांबवण्याची वेळ आली होती.

महापालिका क्षेत्रात पालिकेकडे असणारा लसीचा साठा पुर्णपणे संपला आहे. आज दुपार पर्यंत एकुण 25 हजार लसी शिल्लक होत्या. मात्र या सगळ्या लसी आता वाटून टाकल्याने महापालिकेकडे साठा पुर्णपणे संपला आहे.

दरम्यान वाटलेल्या लसींचा हा साठा दोन दिवस पुरेल आणि लसीकरण मोहीमेत अडचण येणार नाही, असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.