PMC Hospitals Vaccine : 1956 आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली कोरोना प्रतिबंधक लस !

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेसह खासगी रुग्णालयांतील 1956 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

देशव्यापी लसीकरण मोहीमेच्या पहिल्या टप्प्यात पुणे शहर आणि उपनगरातील महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांत लसीकरण मोहीम सुरू आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार कोथरूड येथील जयाबाई सुतार रुग्णालयात 77,  कमला नेहरू रूग्णालयात 131, केईएम हॉस्पिटल 155, ससून रुग्णालय 58, बी.जे.मेडिकल कॉलेज 70, राजीव गांधी रुग्णालय 36 , जोशी हॉस्पिटल 121, रूबी हॉल 159 , बुधरानी इनलेक्स 10, जहांगिर हॉस्पिटल 155, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय 405, नोबेल हॉस्पिटल 52, भारती हॉस्पिटल 240, भारती आयुर्वेद 60, विल्लु पुनावाला 44 , सह्याद्री हॉस्पिटल नगर रस्ता 64 , सह्याद्री हॉस्पिटल हडपसर 48, सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन 77 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.