-MPC-TOP-MOST-BANNER-I

PMPML News : एअरपोर्टला जाण्यासाठी ‘या’ सहा मार्गावरुन PMPML ची ‘अभि’ बस सुरु

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पुणे (लोहगाव) एअरपोर्टला जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी “अभि” ही स्मार्ट एसी बससेवा अनलॉकमध्ये पुन्हा बुधवारपासून सुरु केली आहे. सहा मार्गावरुन ही सेवा सुरु करण्यात आली असून 10 बस दिवसभर धावणार आहेत.

पीएमपीएमएलमार्फत पुणे (लोहगाव) एअरपोर्टला जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी “अभि” (ABHI-Airport Bus for Business, Home & Hotel Interconnectivity) ही स्मार्ट एसी बससेवा पुरविली जाते. परंतु, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शासन निर्देशानुसार पीएमपीएमएलचे बस संचलन बंद ठेवण्यात आले होते. परंतु, आता पीएमपीएमएलची बससेवा हळूहळू पूर्ववत होत आहे. त्या अनुषंगाने पीएमपीएमएलकडून पुणे (लोहगाव) एअरपोर्टवरून “अभि” ही स्मार्ट एसी बससेवा बुधवारपासून सहा मार्गांवर पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

सहा मार्गांवर अभि बस सेवा सुरु
हिंजवडी फेज 3 ते एअरपोर्ट 2 बस, भेकराईनगर ते एअरपोर्ट 2 बस, स्वारगेट ते एअरपोर्ट 2 बस, कोथरुड स्टॅण्ड ते एअरपोर्ट 2 बस, निगडी ते एअरपोर्ट मार्गे भोसरी, विश्रांतवाडी 1 बस आणि निगडी ते एअरपोर्ट मार्गे वाकडेवाडी 1 बस या सहा मार्गांवरुन 10 बस धावणार आहेत. एअरपोर्टला जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन पीएमपीएमएलमार्फत करण्यात आले आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn