PMRDA News : वाल्हेकरवाडीतील दुकानांचे होणार ई-लिलाव

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकक्षेतील पेठ क्र. 30 (वाल्हेकरवाडी, चिंचवड), Convenience Shopping Centre मधील एकूण 31 दुकानांपैकी 11 दुकानांकरीता 5 जानेवारी 2023 रोजी ई-लिलाव प्रक्रीया पार पडली. (PMRDA News) आता, उर्वरीत खालील 20 वाणिज्य दुकानांचे 80 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्यासाठी ई-लिलाव प्रक्रीया राबविण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.

त्यासाठी हवेली तालुक्यातील मौजे वाल्हेकरवाडी, चिंचवड, पेठ क्र. 30 येथील Convenience Shopping Centre मधील 20 वाणिज्य दुकानांचे 11 मे 2023 रोजी होणाऱ्या ई-लिलावाद्वारे भाडेपट्ट्याने वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक लिलावधारकांना शासनाच्या https://eauction.gov.in या संकेतस्थळावरुन 26 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नाव नोंदणी (रजिस्ट्रेशन) करता येईल.

Alandi News : देवाच्या आळंदीत घरफोडी

या  लिलावाची संपूर्ण प्रकीया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या सर्व लिलाव प्रक्रीयेची संपूर्ण माहिती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर (https://pmrda.gov.in) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संपूर्ण लिलाव प्रक्रीया https://eauction.gov.in या संकेतस्थळावरुन होईल. (PMRDA News) त्यासाठी इच्छुक व्यक्तींनी लिलाव प्रक्रीयेत सहभाग घ्यावा असे आवाहन प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.