PMRDA : प्राधिकरणाच्या गृहयोजनेतील सदनिकांसाठी सोमवारपासून  ई-नोंदणी प्रक्रिया

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या पेठ क्र.12 गृहयोजनेतील (PMRDA) सदनिकांसाठीची ई-नोंदणी प्रक्रिया सोमवारपासून सुरु होणार आहे.

​पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पेठ क्र.12 येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत EWS गटासाठी 3317 सदनिका व LIG गटासाठी 1566 सदनिका एकुण 4883 सदनिकांचा गृहप्रकल्प राबविला आहे. या गृहप्रकल्पातील सदनिकांची लॉटरी पध्दतीने विक्री करण्यात आलेली आहे.ज्या लाभार्थ्यांनी सदनिकेची पुर्ण रक्कम भरलेली आहे, त्यांच्या समवेत आर्टीकल ऑफ ॲग्रीमेंट करण्याची प्रक्रिया 6 मार्च 2023 पासुन ई-नोंदणी पध्दतीने करण्यात येणार आहे.

 

Talegaon Dabhade : समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेत एकविरा विद्या मंदिरची जान्हवी सोलकर प्रथम

ई-नोंदणी प्रक्रियेची सुविधा नोंदणी महानिरीक्षक यांचेकडुन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास उपलब्ध करुन दिली असल्यामुळे लाभार्थ्यांना दुय्यम निबंधक कार्यालयातजावे लागणार नाही. ई-नोंदणीचे इमारतीनिहाय वेळापत्रक ऑनलाईन पोर्टलवर लाभार्थ्यांसाठी प्रसिध्द करण्यात आलेले आहे.​पेठ क्र.24 जुने प्राधिकरण कार्यालय, टिळक चौक, निगडी येथे प्रस्तुतची ई-नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे.

लाभार्थ्यांना नोंदणीच्या प्रक्रियेबाबतच्या सविस्तर सूचना पोर्टलवर 16/02/2023 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. लाभार्थ्यांना नोंदणीसाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे शुल्क(सदनिका विक्री किंमतीचा शेवटचा हप्ता, विलंब शुल्क, स्टॅम्प डयुटी, सोसायटी नोंदणी शुल्क, देखभाल खर्च वगैरे) अदा करणे अनिवार्य आहे. सदर शुल्क नोंदणी वेळापत्रकाच्या किमान 4 दिवस आधी भरणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी नोंदणीसाठी येताना (PMRDA) आधार कार्ड, पॅन कार्ड व OTP साठी आधारकार्डला लिंक असणारा मोबाईल हॅंडसेट सोबत घेऊन यावे. नोंदणी प्रक्रियेनंतर सोसायटी नोंदणी प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होऊन तात्काळ ताबा देण्याची कार्यवाही करता येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.