Talegaon Dabhade : समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेत एकविरा विद्या मंदिरची जान्हवी सोलकर प्रथम

एमपीसी न्यूज – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ व कै. ॲड्. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी प्रथमच संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये गुणवत्ता वाढविण्यासाठी व भविष्यातील स्पर्धा परीक्षांचे आकलन व्हावे म्हणून समर्थ शलाका स्पर्धा परीक्षा सुरु करण्यात आली आहे. या परीक्षेत श्री.एकवीरा विद्या मंदिर कार्ला शाळेची विद्यार्थिनी (Talegaon Dabhade) जान्हवी मंगेश सोलकर हिने प्रथम क्रमांक मिळवला तर ॲड्.पु.वा.परांजपे विद्या मंदिर तळेगाव दाभाडेचा विद्यार्थी शुभम संताजी माळी दुसरा आणि श्री एकवीरा विद्या मंदिर कार्ला शाळेची विद्यार्थिनी शरण्या विष्णु हुलावळे हिने तृतीय क्रमांक मिळवला.

उत्तेजनार्थ शिष्यवृत्ती कामनवार राधिका राजेश  प्रगती विद्या मंदिर इंदोरी, उत्तेजनार्थ शिष्यवृत्ती बैकर तेजस दत्ता  श्री. एकवीरा विद्या मंदिर कार्ला यांनी पटकावला. एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा प्रमाणे या परीक्षेचे स्वरूप असल्याने याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षेत उतरून यश मिळवावे यासाठी ‘समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा पायाभरणी ठरेल असा विश्वास नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी व्यक्त केला. समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत खांडगे बोलत होते.

संस्था संचालित सर्व माध्यमिक शाळांतील इ. 9 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. संस्थेच्या सर्व शाळांतील एकूण ७५३ विद्यार्थ्यानी ही परीक्षा दिली. त्यापैकी 155 विद्यार्थी ही परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यातील प्रथम तीन क्रमांकांचे विद्यार्थी व दोन उत्तेजनार्थ विद्यार्थी यांना रोख रक्कम,सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

संस्था पातळीवर झालेल्या तालुक्यातील या पहिल्याच स्पर्धा परीक्षा आहे. या परिक्षेचे नियोजन अत्यंत सूक्ष्म गतीने करण्यात आले होते. शंभर गुणांची ही परीक्षा होती. प्रश्नांना चार पर्यायी उत्तरे देण्यात आली होती. त्यातून विद्यार्थ्यांना एक उत्तराला स्पर्धा परीक्षा प्रमाणे गोल करायचा होता. शालेय वयातच स्पर्धा परीक्षेची भीती नाहीशी व्हावी आणि मावळ तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थांनी स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन यश मिळावे यासाठी आमचा हा प्रयत्न असल्याचे खांडगे म्हणाले.

फार कमी कालावधीत या स्पर्धा परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते,यासाठी एमपीएससी अथवा युपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत काम करणा-या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले असून संस्था पातळीवर घेतलेल्या या स्पर्धा मावळ तालुक्यातील सर्व माध्यमिक विद्यालयात राबविणार असल्याचे सुतोवाच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक  सोनबा गोपाळे गुरूजी यांनी केले.

Talegaon Dabhade News : भरधाव कंटेनरनेच्या धडकेने पादचारी ठार; दोन जण गंभीर जखमी

खांडगे म्हणाले,” नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ ही संस्था स्वातंत्र्य पूर्व काळापासून शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर काम करीत आहे. देशात स्वातंत्र्य चळवळीच्या काळात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोकमान्य टिळक आणि संस्थापक चिटणीस गुरुवर्य आण्णासाहेब विजापुरकर यांनी राष्ट्रीय शिक्षणाची मुहूर्तमेढ (तळेगाव दाभाडे) येथे रोवली.

आजमितीस संस्था अंतर्गत 3 प्राथमिक, 6 माध्यमिक शाळा, 1 सी. बी. एस. ई. इंग्लिश मेडियम स्कुल, 6 ज्युनियर कॉलेज, 2 इंजिनिअरिंग कॉलेज, 2 व्होक ( डिप्लोमा ) कोर्सेस असे एकंदरीत 20 विभाग कार्यरत आहेत. यामध्ये जवळपास 9,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

संस्था आजपर्यत अव्यातपणे हे ज्ञानदानाचे काम पुढे नेत आहे. भविष्यात या संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी स्पर्धेत व भारतीय प्रशासनात अधिकारी म्हणून यावेत यासाठी त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी संस्थेने या वर्षीपासुन समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा सुरु केलेली आहे. या परीक्षेस विद्यार्थी आणि पालकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचे सर्व पातळीवर स्वागत होत आहे.

Pune News : महिला दिनापासून प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला महिलांना पीएमपीएमएलतर्फे मोफत प्रवास

संस्थेचे सचिव व प्रकल्प प्रमुख  संतोष खांडगे यांच्या संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली उत्तम नियोजन करण्यात आले. यासाठी प्रकल्प सहप्रमुख सोनबा गोपाळे (गुरुजी) यांनी काम पाहिले.संस्थेचे आधारस्तंभ मावळभुषण कृष्णराव भेगडे साहेब व संस्थेचे अध्यक्ष बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के, सहसचिव नंदकुमार शेलार तसेच शाळा समिती अध्यक्ष दामोदर शिंदे,यादवेंद्र खळदे, महेश शहा व  विनायक अभ्यंकर यांनी सहकार्य केले.

संस्थेने यावर्षी इ. 9 वीतील एकूण 753 विद्यार्थ्यांची या परीक्षेसाठी निवड करून तशी तयारी शाळा शाळांमध्ये करून घेण्यात आली. नित्याचे दैनिक शैक्षणिक काम करून सर्व शाळांमधील शिक्षकांनी जादा वर्ग घेतले. त्या सर्व विद्यार्थ्याच्या वेळोवेळी परीक्षा घेऊन त्यांची मानसिकता तयार केली व अंतिम शिष्यवृत्ती पात्र परीक्षा घेतली. या सर्व परीक्षा अतिशय पारदर्शी व स्पर्धात्मक व MPSC/ UPSC च्या नियमानुसार घेण्यात आल्या.

या परीक्षेची पेपर तपासणी स्पर्धात्मक व MPSC/ UPSC च्या नियमानुसार करण्यात आली त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेचा सराव झाला व त्यांची परीक्षा बद्दलची भिती दुर झाली. तसेच शालेय स्तरावर मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षेकेत्तर सर्व कर्मचाऱ्यांचा या परीक्षेत सक्रीय राहिले.

दि. 09 /02 /2023 रोजी पहिली शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली या परीक्षेस एकूण 753 विद्यार्थी बसले यापैकी एकूण 155 विद्यार्थी अंतिम परीक्षेस पात्र ठरले. अंतिम परीक्षा दि. 25 /02 / 2023 रोजी संस्थेची पहिली ऐतिहासिक शाळा नवीन समर्थ विद्यालय येथे पार पडली या अंतिम परीक्षेचा निकाल लागला..

प्रथम क्रमांक सोलकर जान्हवी मंगेश श्री. एकवीरा विद्या मंदिर कार्ला, द्वितीय क्रमांक माळी शुभम संताजी  ॲड्. पु. वा. परांजपे विद्या मंदिर तळेगाव दाभाडे, तृतीय क्रमांक  हुलावळे शरण्या विष्णु श्री. एकवीरा विद्या मंदिर  कार्ला.

1 उत्तेजनार्थ शिष्यवृत्ती  कामनवार राधिका राजेश  प्रगती विद्या मंदिर इंदोरी, उत्तेजनार्थ शिष्यवृत्ती बैकर तेजस दत्ता  श्री. एकवीरा विद्या मंदिर कार्ला यांनी पटकावला.

शाळेनिहाय प्रथम क्रमांक

( प्रोत्साहनपर ), नवीन समर्थ विद्यालय  भुरूक पायल सोमनाथ,  श्री. छत्रपती शिवाजी विद्या मंदिर  हेलगंड रचना पंडित,पवना विद्या मंदिर चव्हाण हर्शल सुनील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.