Pune News : महिला दिनापासून प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला महिलांना पीएमपीएमएलतर्फे मोफत प्रवास

एमपीसी न्यूज –  जागतिक महिलादिनाचे औचित्य़ साधून पीएमपीएमएलतर्फे (Pune News) महिलांसाठी खास 8 मार्च पासून प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला  मोफत बस प्रवास हि योजना पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र हा मोफत प्रवास महिलांना महिलांसाठी असलेल्या खास तेजस्वीनी बस मधूनच करता येणार आहे, अशी माहिती पीएमीपीएमएल प्रशासानाने प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केली आहे.

पीएमपीएमएल ने दिलेल्या माहितीनुसार, या जागतीक महिला दिनापासून 8 तारखेला महिलासांठी मोफत प्रवास ही योजना पुर्वत करण्यात येत आहे. या आधी 6 मार्च 2019 रोजी  संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दर महिन्याच्या 8 तारखेला महिलांना तेजस्विनी बसमध्ये मोफत बस प्रवास करू देण्यास मान्यता दिलेली होती. त्या अनुषंगाने परिवहन महामंडळामार्फत खास महिलांसाठी 23 मार्गावर 28 तेजस्विनी बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र मध्यतंरी  कोविड मुळे महिला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याने या बसेस बंद करण्यात आल्या होत्या.

 

Pune News : होळी पेटवा पण जरा जपून, अग्निशमनदला तर्फे दक्षतेचे आवाहन

मात्र आता कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्याने व सर्व मार्गावर पूर्ण क्षमतेने बस संचलन सुरू करण्यात आले आहे. महिला तेजस्विनी बसेस पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेस ‘तेजस्विनी’ बस मधून मोफत प्रवास सेवा हि योजना 8 मार्च 2023 पासून पूर्ववत करण्यात येत आहे. महिलांनीही जागतिक महिला दिनानिमित्त तेजस्विनी बसेस मधून महिलांनी मोफत प्रवास करावा, असे  आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.