Pune : पोलिसांच्या तावडीतून पाळलेल्या अरोपीस ५ तासांत पकडले

येरवडा कारागृहासमोरून काढला होता पळ, सागर चांदणेवर गंभीर गुन्ह्यांची नोंद

एमपीसी न्यूज – खडक पोलिसांनी अवघ्या 5 तासांमध्येच पळून गेलेल्या आरोपीला सापळा रचून त्रिकोणी गार्डन काशेवाडी येथून अटक केली.
सागर दत्ता चांदणे (वय 19,रा. महादेव वाडी, खडकी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंभीर गुन्ह्यातील आरोपी सागर चांदणे हा न्यायालयात हजर राहात नसल्याने न्यायालयाने त्याच्याविरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट काढले. त्यानंतर पोलिसांनी त्या वॉरंटमध्ये सागरला अटक करून न्यायालयात हजर केले. दरम्यान त्याला येरवडा येथील कारागृहात सोडण्यास जाणाऱ्या खडक पोलिसांच्या हातून तो येरवडा कारागृहासमोरून पळून गेला. याप्रकरणी त्याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

खडक पोलिस ठाण्याचे कर्मचारी रवी लोखंडे यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत सागर चांदणे हा त्रिकोणी गार्डन काशेवाडी येथे मित्राला भेटायला येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी साध्या वेशामध्ये सापळा रचून पळून गेलेल्या सागरला अवघ्या पाच तासांमध्ये ताब्यात घेऊन येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी सागर चांदणे याच्याविरुद्ध खुन, जबरी चोरी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रदीप आफळे, खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, कर्मचारी विठ्ठल पाटील, संदीप पाटील, रवी लोखंडे, आणि आशिष चव्हाण, बंटी कांबळे, समीर माळवदकर, प्रमोद नेवसे, इम्रान नदाफ, विनोद जाधव, विशाल जाधव, सागर केकाण यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.