Shahunagar news: प्रभाग क्रमांक दहा शाहूनगर ,संभाजीनगर,दत्तनगर विद्यानगर व इतर परिसरामध्ये पोलिसांची गस्त वाढणार

एमपीसी न्युज: शाहूनगर,संभाजीनगर दत्तनगर विद्यानगर व मोरवाडी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात गळ्यातील चेन चोरणे (Chain snatching), घर फोडायचे प्रकार होत असून यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी, यासाठी निवेदन देण्यात आले.

त्याचबरोबर शाहूनगर व संभाजीनगर मध्ये शाळा कॉलेज परिसरात हुल्लडबाजी करणारे तरुण टू व्हीलर वर जोरजोरात हॉर्न देऊन गाडी चालवणे, सायलेन्सर मधून मोठा आवाज काढणे, त्याचबरोबर बाईकवर तीन तीन,चार चार जण एकत्र बसून हुल्लड बाजी करणे, असे प्रकार वाढले असून यावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी आज नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून केली.

Vanawadi fire news : वानवडी लागलेल्या भीषण आगीत चार ते पाच घरे जळाली

याप्रसंगी त्यांच्या समवेत नंदा करे, तसेच उषा सरोदे व इतर महिला भगिनी उपस्थित होत्या. त्यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या परिसरामध्ये पोलीस गस्त लवकरच वाढवू व असे प्रकार घडू नयेत यासाठी च्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित दिल्या आहेत.

यावर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनीही योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. माजी नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या तक्रारीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.अनुराधा गोरखे यांनी माननीय आयुक्त तसेच पोलिसांचे आभार मानले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.