Sangavi news: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खळखट्याकचा इशारा दिल्यानंतर 12 तासाच्या आतच कामाला सुरवात झाली

एमपीसी न्युज : जुनी सांगवी डेंगूची साथ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले होते.

जुनी सांगवीत अनेक ठिकाणी अनेक दिवसापासून असलेले कचऱ्याचे ढीगारे कचरा संकलनाचे स्वरूप आले होते. नविन नेमलेले आरोग्य निरीक्षकाचे व इतर अधिकाऱ्यांचे कर्मचारी दुर्लक्ष करत होते. त्यात डेंगूची साथ चालू सांगवीत अनेक रूग्ण आढळले आहेत. सांगवी तसेच पिं.चिं.शहरात डेंगीचे रूग्ण दगावले आहेत.

Shahunagar news: प्रभाग क्रमांक दहा शाहूनगर ,संभाजीनगर,दत्तनगर विद्यानगर व इतर परिसरामध्ये पोलिसांची गस्त वाढणार

नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांकडून पाहणी करून आरोग्य विभागाने लवकर उचलला नाही तर लवकरच कचऱ्याच्या गाड्या भरून मनसे स्टाईलने सर्व कचऱ्याच्या गाड्या सांगवी आरोग्य कार्यालयात खाली करणार, असा आरोग्य विभागाला इशारा दिला होता.

वेळेत काम केल्याने राजू सावळे,पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आरोग्य विभागाचे आभार मानले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.