Pune News: राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर, ‘या’ हनुमान मंदिरात करणार महाआरती

एमपीसी न्यूज – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर आहेत. मागील काही दिवसांपासूनची राज ठाकरे यांची भूमिका पाहता त्यांचा हा पुणे दौरा महत्त्वाचा मानला जातोय. पुणे मनसेनेही राज ठाकरे यांच्या पुढे दौर्‍याची जय्यत तयारी सुरू केली.

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यातील खालकर चौकातील हनुमान मंदिरात महाआरती होणार आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला मनसेचे राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते येणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

राज ठाकरे यांनी यापूर्वी मशिदीवर चे भोंगळे काढावे अन्यथा त्या समोर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लावणार अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर घेतलेल्या उत्तर सभेतही त्यांनी आपल्या मशिदीवरील वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं होतं.

राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर राजकीय घमासान पाहायला मिळालं होतं. दरम्यान मनसेतिलच काही कार्यकर्त्यांनी मात्र राज ठाकरे यांच्या या भूमिकेविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ते कार्यकर्ते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 

राज ठाकरे यांच्या मशिदीवरील वक्तव्यानंतर म्हणून येथील अनेक मुस्लीम कार्यकर्ते नाराज झाले होते. काहींनी तर राजीनामे दिले आहेत.

दरम्यान पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी पोलिसांनीही तयारी केली आहे. नाराज मुस्लिम कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या या निर्णयानंतर काय भूमिका घेतात हे यानिमित्ताने समोर येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.