Chinchwad News : पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची अंतर्गत बदली 

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची अंतर्गत बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव या बदली करण्यात आल्याचे आयुक्तालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांची हिंजवडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांची एमओबी पीसीबी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नेमणूक केली आहे. आणि वाकड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी यापूर्वी नियंत्रण कक्षाची (शिरगाव पोलीस चौकी) जबाबदारी सांभाळणारे सत्यवान माने यांची नेमणूक केली आहे.

तसेच, पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नेमणूक केली आहे. यापूर्वी खंडाळे यांच्या कडे नियंत्रण कक्षाची (एमओबी पीसीबी) जबाबदारी होती. शिरगाव पोलीस चौकीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी वनिता कृष्णा कदम / धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वनिता कदम यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी कार्यरत होत्या.

 

बदली प्रमाणे अधिका-यांनी नेमणूकीच्या ठिकाणी तात्काळ हजर राहून पूर्तता अहवाल सादर करावा अशी सूचना करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.