Katraj News: दरीत सापडला जळालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह, घातपात की अपघात तपास सुरू

एमपीसी न्यूज – पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कात्रज परिसरात जळालेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. कात्रज दरी परिसरात हा मृतदेह सापडला.

मृतदेह जळालेला असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. मात्र मृतदेहाच्या शेजारीच एक दुचाकी सापडली असून या दुचाकीच्या नंबर प्लेट वरून संबंधित तरुण वानवडी परिसरातील असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी, कात्रज येथील एका खोल दरीत मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण केले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी खोल दरीत उतरून मृतदेह बाहेर काढला. मात्र तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटविण्यास अडचण निर्माण झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार हा तरुण दोन दिवसांपूर्वी रागाच्या भरात घरातून बाहेर पडला होता. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात त्याचा तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.