Sushantsingh Rajput: पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूच्या वेळेचा उल्लेख नाही, वकिलांचा दावा

Post Mortem Report Of Sushant: Lawyers claim that Sushant's death time was not mentioned in the postmortem report सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्र व बिहार ही दोन्ही राज्ये आमनेसामने आल्याचं बघायला मिळत आहे.

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाला आता दोन महिने उलटून गेले आहेत. प्रथमदर्शनी ही सुशांतची आत्महत्याच असल्याचे दिसत असून त्यानं हे नैराश्यातून केल्याचं जाणवत आहे. मात्र, त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. त्याला राजकीय रंग येतो की अशी देखील आता शंका येत आहे.

प्रकरण सीबीआयकडे सोपवावे का याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने अजून जाहीर केलेला नाही. दररोज वेगवेगळ्या थिअरी मांडल्या जात आहेत. सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरुन सुशांतचे वडील के. के. सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी नवीन शंका उपस्थित केली आहे.

के. के. सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी म्हटले आहे. ‘सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मी पाहिला आहे. त्यात त्याच्या मृत्यूच्या वेळेचाच उल्लेख नाही, जी की महत्त्वाची माहिती आहे. त्याला मारल्यानंतर फाशी देण्यात आली की फाशी घेऊन मरण पावला हे मृत्यूच्या वेळेवरून स्पष्ट केलं जाऊ शकतं’, असं विकास सिंह यांनी म्हटलं आहे.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्र व बिहार ही दोन्ही राज्ये आमनेसामने आल्याचं बघायला मिळत आहे. सध्या याचा फैसला सर्वोच्च न्यायालयात आहे. बिहार सरकारनं सीबीआय चौकशीची शिफारस केल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं त्याला विरोध केला आहे. शिफारस करण्याचा अधिकारच बिहार सरकारला नसल्याचं महाराष्ट्रानं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.