Graduate Election : पदवीधर निवडणुकीस स्थगिती देऊन निवडून प्रक्रिया पुन्हा राबवावी – भारतीय मराठा महासंघ

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधर निवडणुकीस (Graduate Election) स्थगिती देऊन निवडणूक प्रक्रिया पुन्हा राबवावी, अशी मागणी भारतीय मराठा महासंघ यांनी निवेदनाद्वारे निवडणूक अधिकारी प्रफुल्ल पवार यांच्याकडे केली आहे.

हे निवेदन देताना उपजिल्हाध्यक्ष ऋषिकेश कानवटे, प्रमुख संघटक निरज सुतार,अजय चव्हाण, रविंद्र जगताप उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, भारतीय मराठा महासंघ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधर निवडणुकीच्या गलथान कारभाराच्या विरोधात तक्रार करीत आहोत, की आपण विद्यापिठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांची निवडणूक घेत असताना अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे गरजेचे होते.  परंतु, आपण अशी कोणतीही पत्रकार परिषद न घेता तसेच नवीन पदवीधर मतदारांना आणि निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांना अंधारात ठेवून दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

नवीन पदवीधर मतदारांपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया मतदारांपर्यंत पोहोचली आहे का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने – Graduate Election

1) नवीन पदवीधरांना पदवीधर मतदार म्हणून नोंदणीसाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी.

2) पुणे पदवीधर मतदार संघातील पुणे जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या मतदारांना या आधिसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावा.

3) दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जाहीर केलेल्या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती देऊन निवडणूक प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवण्यात यावे.

वरील सर्व मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार न केल्यास 20 नोव्हेंबर रोजी विविध मतदान केंद्रांवर भारतीय मराठा महासंघाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलने केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.