Pradhanmantri Matruvandana : …’असा’ मिळवा मातृवंदना योजनेचा लाभ!

एमपीसी न्यूज – माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी गरोदर व स्तनदा मातांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना (Pradhanmantri Matruvandana) ही योजना आहे. शासकीय नोकरदार महिला वगळता उर्वरित सर्व गर्भवती महिलांना पहिल्या अपत्यासाठी या योजनेतून प्रत्येकी पाच हजारांचा लाभ दिला जातो.

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी महापालिकेचे रुग्णालय, आशा, अंगणवाडी कार्यकर्ता, आरोग्य सेविका किंवा शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क करावा. त्याचे पैसे तीन टप्प्यात मिळतात. पहिला हप्ता 1 हजार रुपये लाभार्थींना गरोदरपणाची नोंद 100 दिवसांचे आत केल्यानंतर, दुसरा हप्ता 2 हजार रुपये गरोदरपणाच्या 6 महिन्यांत (180) किमान प्रसूतिपूर्व तपासणी केल्यानंतर, तिसरा हप्ता 2 हजार रुपये प्रसूतीनंतर बाळाच्या जन्माची नोंद, बीसीजी, ओपीव्ही, (झिरो डोस) यांची एक मात्रा तसेच पेंटाव्हालेंट, ओपीव्ही लसीच्या तीन मात्रा घेतल्यानंतर लाभ मिळेल.

पहिला व दुसरा हप्ता मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे – Pradhanmantri MatruvandanaGovernment

लाभार्थीच्या आधारकार्डची झेरॉक्स प्रत, इतर ओळखपत्र
राष्ट्रीयकृत बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
माताबाल संरक्षक कार्डची झेरॉक्स 

तिसरा हप्ता मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

लाभार्थीच्या आधारकार्डची झेरॉक्स प्रत, इतर ओळखपत्र
राष्ट्रीयीकृत बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
माताबाल संरक्षक कार्डची झेरॉक्स
बाळाच्या जन्माच्या दाखल्याची झेरॉक्स

पात्रतेचे निकष, अटी – Pradhanmantri Matruvandana

 

  1. जननी सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना त्या योजनेच्या निकषानुसार अतिरिक्त लाभ देय राहील.

    2. नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा बालक मृत जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ एकदाच लागू राहील.

    3. दारिद्र्य रेषेखालील व वरील लाभार्थींना ही योजना लागू राहील.

    4. वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या नोकरदार महिलांना ही योजना लागू नाही.

    5. गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत 150 दिवसांच्या आत नोंदणी करणे, लाभार्थी व तिच्या पतीचे आधारकार्ड देणे, लाभार्थींचे आधारकार्डशी जोडलेले बँक खाते, प्राथमिक लसीकरण, बाळाचा जन्म नोंदणी दाखला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.