Lonavala News : प्रशांत कोराळे हिंदु हृदयसम्राट श्री तर अविनाश खैरे लोणावळा श्री 2022 चा मानकरी

एमपीसी न्यूज – लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने शिवजयंती महोत्सवाच्या निमित्त आयोजित भव्य जिल्हास्तरीय शरिरसौष्ठव स्पर्धेत उरळीकांचन येथील प्रशांत कोराळे हा हिंदु हृदयसम्राट श्री 2022 तर लोणावळ्यातील ओम फिटनेसचा अविनाश खैरे हा लोणावळा श्री 2022 किताबाचा मानकरी ठरला. लोणावळा श्री स्पर्धा एका गटात तर हिंदु हृदयसम्राट श्री स्पर्धा सात गटात पार पडली. फिटनेस अँन्ड बाॅडी बिल्डर्स असोसिएशन पिंपरी चिंचवड यांच्या मान्यतेने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या शरीरसौष्ठव स्पर्धचे उद्घाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, संघटक अंकुश देशमुख, उपतालुकाप्रुख आशिष ठोंबरे, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, बाॅडीबिल्डींग असोसिएशनचे डाॅ संजय मोरे, अध्यक्ष मनोज जरे, राजेश सावंत, मावळ वार्ता फाउंडेशनचे डाॅ. किरण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेसाठी आरपीआय जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, नगरसेवक शिवदास पिल्लै, निखिल कविश्वर, माणिक मराठे, सिंधू परदेशी, कल्पना आखाडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जीवन गायकवाड, सरपंच बंडुभाऊ फाटक, उद्योजक नंदुभाऊ फाटक, झिशान शेख, समन्वयक जयवंत दळवी, सल्लागार रामभाऊ थरकुडे, उपशहरप्रमुख संजय भोईर, मनेष पवार, प्रकाश पाठारे, युवासेना शहर अधिकारी तानाजी सुर्यवंशी, उपतालुका संघटीका संगिताताई कंधारे, श्रीमती आक्का पवार, शिवजयंती महोत्सव अध्यक्ष श्रीकांत कंधारे, कार्याध्यक्ष प्रशांत आजगेकर, रविंद्र टाकळकर, सुरेश टाकवे, नरेश काळवीट, पंकज खोले, माजी नगरसेवक मधुकर पवार यांच्यासह अनेकांनी भेटी दिल्या.

शिवजयंती उत्सवा निमित्त शिवसेनेच्या वतीने भगवा ध्वजारोहन, शिवप्रतिमा पूजन, सत्यनारायणाची पूजा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती. दुसर्‍या दिवशी लोणावळा-खंडाळा मर्यादित नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, तर तिसर्‍या दिवशी शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्यात आली.

जितेंद्र कल्याणजी, संजय अडसुळे, नंदकुमार वाळुंज, सचिन पारख, बाबुभाई शेख, विनय विद्वांस, नासीर शेख, प्रकाश काळे, सुनिल मराठे, दत्ता थोरवे, गणेश फरांदे, संजय शिंदे, अशोक बोंद्रे, विजय आखाडे, संतोष मेंढरे, सहसंघटिका मनिषा भांगरे, उपशहरसंघिका प्रभाताई आकोलकर, सुरेखा देवकर, उत्तम ठाकर, ओम फिटनेस क्लब चे ओमकार फाटक व त्यांचे सर्व सहकारी मित्र परिवार व शिवसेना युवासेना महिला आघाडी वाहतुक सेना व सर्व आजीमाजी पदाधिकारी नगरसेवक या महोत्सवात सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.