Wakad News: रिक्षाचालकांना स्मार्ट सिटीत प्राधान्य देणार – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल प्रमाणेच रिक्षा चालक देखील प्रवासी सेवा देत आहेत. त्यांचे योगदान मोठे आहे. या यंत्रणेशी रिक्षाचालकांना जोडले गेले पाहिजे. रिक्षा चालक देखील प्रवासी व्यवस्थेचा अंतर्गत भाग झाला पाहिजे,  यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी दिले. स्मार्ट सिटीमध्ये मेट्रो बीआरटीशी रिक्षाचालकांना जोडून त्यांनाही स्मार्ट सिटीत प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाकड येथील तिरंगा रिक्षा स्टँडचे राहुल कलाटे यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. नगरसेवक मयूर कलाटे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष सोमनाथ कलाटे, रिक्षा ब्रिगेडचे बाळासाहेब ढवळे, महाराष्ट्र वाहतूक पंचायतचे सदाशिव तळेकर, सुरेंद्र जाधव, मोहन काटे, विजय ढगारे, संजय दौंडकर, धनंजय कुदळे, नवनाथ जोगदंड, भागवत उजने आदी उपस्थित होते.

राहुल कलाटे पुढे म्हणाले, रिक्षा चालकांनी मीटरप्रमाणे भाडे आकारावे अशी गृहनिर्माण सोसायटी धारकांची मागणी आहे.  त्यानुसार मीटर प्रमाणे भाडे आकारावे. प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये संवाद ठेवावा.

रिक्षा स्टँडवर पाणपोई, वाचनालय सुरु व्हावे, यासाठी मी सर्वतोपरी मदत करणार आहे. हे रिक्षा स्टँड शहरातील आदर्श रिक्षा स्टँड म्हणून पुढे यावे यासाठी प्रयत्न केला जाईल. परंतु, नागरिकांच्या देखील तक्रार येऊ नये असाही प्रयत्न रिक्षाचालकांनी करावा.

बाबा कांबळे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात मीटरने रिक्षा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. परंतु, रिक्षाचालकांचे इतर जे प्रश्न आहेत. त्यामध्ये नविन रिक्षा स्टँडला मान्यता मिळणे.  शेअर ए रिक्षाने प्रवास. रिक्षाचालकांवर ऑनलाइन  खटले भरले जाऊ नयेत. बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई करावी. मुक्त रिक्षा परवाना बंद करावा , रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, अशा आमच्या मागण्या आहेत.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तिरंगा रिक्षा स्टँडचे अध्यक्ष तुकाराम देवरे, उपाध्यक्ष दिनेश कांबळे, कार्याध्यक्ष जाफर शेख, खजिनदार गणेश गाढवे, सेक्रेटरी इरफान सय्यद, सचिव संजय वाघमारे, राजेंद्र मस्के, अनिल शिंदे, भारत गुंडकर, गणपत कांबळे,प्रकाश शिंदे, सिद्धार्थ साबळे, प्रदीप अय्यर, रवींद्र सरगडे, प्रकाश कुंभार, दत्ता राजे, दयानंद वाघमारे, अफसर सय्यद, अनिल शिरसाट, जावेद सय्यद, ज्ञानेश्वर विटकर, योगेश शिंदे, अक्षय बनसोडे, परमेश्वर सूर्यवंशी, आकाश लिंबळे, दिगंबर सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.