Sindhutai Sapkaal : सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

एमपीसी न्यूज : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या,हजारो लेकरांची माय सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुताईंच्या निधनावर शोक व्यक्त केला असून, समाजासाठी त्यांनी केलेल्या या उदात्त सेवेबद्दल त्यांचे स्मरण केले जाईल, असे म्हटले आहे. पंतप्रधान नंरेंद्र मोदी यांनीसुद्धा ट्वीट् करत शोक व्यक्त केला आहे.

डॉ.सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्या नेहमीच आपल्या स्मरणात राहतील. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक मुले चांगल्या दर्जाचे जीवन जगू शकले आहेत. त्यांनी उपेक्षित समुदायांमध्येही खूप काम केले. त्यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे . त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो.ओम शांती,असे ट्विट् करत पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

डॉ सिंधुताई सपकाळ यांचे जीवन हे धैर्य, समर्पण आणि सेवेची प्रेरणादायी गाथा आहे. त्यांनी अनाथ, आदिवासी आणि उपेक्षित लोकांवर प्रेम केले आणि त्यांची सेवा केली. 2021 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, त्यांनी अविश्वसनीय धैर्याने स्वतःची कथा लिहिली. त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि अनुयायांप्रती संवेदना व्यक्त करतो,असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.