PM Modi in Gujarat : ‘मां, ये सिर्फ एक शब्द नहीं है….’ आईसाठी पंतप्रधान मोदी यांची भावनिक पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे शंभराव्या वर्षात पदार्पण

एमपीसी न्यूज – “आई केवळ हा एक शब्द नसून जीवनाची ती अनुभूती आहे, ज्यामध्ये प्रेम, संयम, विश्वास, खूप काही सामावलेले आहे” अशी भावनिक पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi in Gujarat) यांनी त्यांच्या आईसाठी लिहिली आहे. पंतप्रधान मोदी यांची आई हिराबा यांनी आज ( दि. 18 जून) 100 व्या वर्षांत पदार्पण केले, त्यानिमित्त त्यांनी गुजरात येथे आईची सदिच्छा भेट घेत आईचे आशिर्वाद घेतले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi in Gujarat) यांच्या मातोश्री हिराबा यांनी आज 100 व्या वर्षांत पदार्पण केले. या विशेष दिवसाचे निमित्त साधून पंतप्रधान मोदी आईची भेट घेण्यासाठी गुजरामध्ये आपल्या घरी पोहोचले आणि आईची भेट घेतली. यापूर्वी 11 मार्च रोजी गुजरात दौऱ्यादरम्यान त्यांनी आईची भेट घेतली होती.

E-Way Traffic Jam : खोपोलीजवळ तीन अपघात; मुंबईकडे जाणारी वाहतूक पहाटे दोन तास ठप्प

MLC Election 2022 : आदित्य ठाकरे रात्री साडेबारा वाजता शिवसेना आमदारांच्या भेटीला, हॉटेलमध्येच मुक्काम

दरम्यान, शंभराव्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या आईविषयी लिहिताना पंतप्रधान मोदी (PM Modi in Gujarat) म्हणतात, “आई केवळ हा एक शब्द नसून आई जीवनाची ती अनुभूती आहे, ज्यामध्ये प्रेम, संयम, विश्वास, खूप काही सामावलेले आहे. माझी आई हिराबा आज 18 जून रोजी शताब्दी वर्षांत पदार्पण करत आहे, हे मी माझे भाग्य समजतो आणि त्यानिमित्त मी आनंद व्यक्त करतो आहे. “, असे म्हणून पंतप्रधान मोदी यांनी आईसाठी भावनिक पोस्ट लिहून शुभेच्छा दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.