Pimpri News : दररोज पाणीपुरवठा करा, चिखलीतील जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु करावा; मनसेची मागणी

एमपीसी न्यूज – चिखलीतील जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु करावा. निघोजे बंधा-यातून पाणी उचलावे. मागील तीन वर्षांपासून एकदिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात (Pimpri News) असलेल्या शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी मनसेने आज (सोमवारी) महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले.

शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामध्ये महिला शहराध्यक्षा अश्विनी बांगर, महिला शहर सचिव सीमा बेलापूरकर,  संगीता देशमुख, विद्या कुलकर्णी,  विशाल मानकरी, राजू सावळे,  चंद्रकांत  दानवले, रुपेश पटेकर, दत्ता देवतरासे, मयूर चिंचवडे, सुशांत साळवी, नितीन सूर्यवंशी, शिवकुमार लोखंडे, तुकाराम शिंदे, अमर माळी,  नितीन चव्हाण, राजू भालेराव, राजेश अवसरे, श्रद्धा देशमुख, कैलास दुर्गे, निलेश नेटके, कृष्णा महाजन, सुरेश सकट, विशाल उकिरडे, सोनू भोसले, ॲलेक्स आप्पा मोजेस, नारायण पठारे, शिशिर महाबळेश्वरकर, रोहित काळभोर, मंगेश भालेकर, रोहित थोरात, बाळा शिवशरण, आशिष शेलार, सागर शिंदे, जय सूर्यवंशी, आकाश सागरे सहभागी झाले होते.

Pune News : प्रेमगंध मेडिटेशन संस्थेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

चिखले म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहरात आज जवळपास तीन वर्षांहून अधिक काळ ‘दिवसाआड’ पाणी पुरवठा सुरु आहे. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. आजतागायत दिवसाआडच पाणीपुरवठा सुरु आहे. (Pimpri News) प्रशासनाची अडचण समजून शहरातील नागरिकांनी पालिकेस सहकार्य केले. पण, आता नागरिकांचा संयम सुटत आहे. नियमित पाणी देऊन शहरवासीयांना दिलासा द्यावा. तसेच लवकरात-लवकर चिखली पाणीपुरवठा प्रकल्प सुरु करावा. अन्यथा मनसेला पुढील काळात कठोर भूमिका घ्यावी लागेल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.