Punawale : पुनावळेतील प्रस्तावित कचरा डेपोविरोधात रविवारी बाईक रॅली

एमपीसी न्यूज –  पुनावळेतील प्रस्तावित कचरा डेपो रद्द ( Punawale) करण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिक येत्या रविवारी (दि.5) बाईक रॅली काढणार आहेत.

पुनावळे येथील 18 अक्षांश मॉलपासून बाईक रॅली रविवारी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. पुनावळे येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कचरा डेपोला पुनावळे, ताथवडे, वाकड, रावेत व आजूबाजूच्या सोसायट्यांमधील रहिवाशांना सोबत घेऊन विरोध करण्यासाठी ही रॅली काढण्यात आला आहे.

Nigadi : निगडीतील शांताराम बोऱ्हाडे यांच्या पत्राची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दखल

पुनावळे येथील प्रस्तावित कचरा डेपोला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी नागरिकांनी या बाईक रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुनावळे येथे वन विभागाने महापालिकेला हस्तांतरित केलेली 26 हेक्‍टर जमीन आहे. सन 2008 मध्ये ही जमीन कचरा डेपोसाठी आरक्षित केली आहे.

मात्र, कचरा डेपोला स्थानिकांचा मोठा विरोध आहे. गेल्या पंधरा वर्षात या भागात विविध शैक्षणिक संस्था, मोठ-मोठे गृहप्रकल्प उभारण्यात आले आहेत. जवळच हिंजवडी माहितीनगरी असल्याने देशभरातून आलेले नागरिक पुनावळे परिसरात स्थायिक झाले आहेत.

सध्या पुनावळे परिसराची लोकसंख्या एक लाखाच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे येथे कचरा डेपो झाल्यास येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होईल, अशी भीती स्थानिकांना वाटत आहे.

त्यामुळे कचरा डेपोचे आरक्षण रद्द करण्याची मागणी ( Punawale)  नागरिकांकडून केली जात आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.