Pune : कोरोना संकट; अखंड हरिनाम सप्ताह, गणेश उत्सव सोहळा रद्द : बाबा धुमाळ

एमपीसी न्यूज – राजयोग प्रतिष्ठान वारजे यांच्यावतीने आयोजित करण्यात येणारा भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री गणेश उत्सव सोहळा कोरोना विषाणूच्या संकटामुळे रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक -अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी दिली.

वारजे येथील श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळ व राजयोग प्रतिष्ठानच्या दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर वार्षिंक श्री गणेश उत्सव सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. यानिमित्त आठ दिवसाचा विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. दरवर्षी महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार आपल्या सुश्राव्य किर्तनातुन समाजाला समाजप्रबोधनानने ज्ञानदानाचे कार्य करीत असतात. यावर्षी मंडळाने एक वेगळा उपक्रम राबविण्याचे ठरविले होते.

हे कार्यक्रम २६ एप्रिल ते ४ मे या नऊ दिवसाच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत महिला किर्तनकार भगिनीचे किर्तन आयोजित केली होते. त्याचबरोबर या कार्यक्रमात महिला किर्तनकार बरोबरच महिला मृदूंग वादक, महिला गायक अशा महिलांना प्राधान्य देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर या वर्षी या मंडळाची कार्यकारिणी सुध्दा महिलांचीच करण्यात आली होती. या महिलांच नेतृत्त्व पुणे मनपाच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ या करीत आहेत.

या सप्ताह काळात पहाटेपासून रात्रीपर्यंत अनेक धार्मिक व सांप्रदायिक, महिला भजन, प्रवचन, गाथा भजन, हरिपाठ, काकड आरती, हरीजागर, आदी कार्यक्रम होणार होते. या सप्ताहचे नेतृत्त्व ह. भ. प. धर्मराज महाराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.

या देखण्या व आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करीत असताना कोरोना विषाणूचा हाहाकार व महाभयंकर रोगामुळे तसेच लाॅकडाऊनमुळे हा कार्यक्रम रद्द करावे लागले. त्यामुळे सर्व अध्यात्मिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय मंडळाच्या संयोजन समितीने घेतला आहे. या कार्यक्रमाच्या खर्चातून बचत झालेल्या रकमेतून परिसरातील गोरगरीब, गरजू कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येत आहे, असेही बाबा धुमाळ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.