Pune : कोरोनाच्या 170 रुग्णांना डिस्चार्ज, 9 जणांचा मृत्यू, 182 नवे रुग्ण

170 patients discharged from the corona, 9 died, 182 new patients

एमपीसी न्यूज – कोरोनाचे 170 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना आज, शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला. या रोगामुळे 9 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 182 नवे रुग्ण आढळले.

सध्या कोरोनाचे 183 क्रिटिकल रुग्ण असून, यापैकी 45 जण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 370 जण दगावले आहेत. पुण्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 2 हजार 402 आहे. आजपर्यंत 4 हजार 675 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज कोरोनाच्या 1 हजार 656 चाचण्या करण्यात आल्या. शहरात कोरोनाचे 7 हजार 447 रुग्ण झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

कोंढवा खुर्दमधील 49 वर्षीय महिला, घोरपडी पेठेतील 63 वर्षीय महिला, गवळीवाडा-कॅम्पमधील 80 वर्षीय महिला आणि कोंढाव्यातील 72 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, तर न्यू नाना पेठेतील 61 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, लक्ष्मीनगरमधील 78 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

तसेच कोरेगाव पार्कमधील 64 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, कोंढवा खुर्दमधील 45 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, मुंबईतील 74 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते.

पुण्यात आता कोरोनाचे 7 हजार 447 रुग्ण झाले आहेत. तर, आतापर्यंत एकूण 370 नागरिकांना या रोगामुळे आपल्या प्राणास मुकावे लागले.

मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये जेष्ठ नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त लठ्ठपणा, हृदयविकार, किडनी विकार, मधुमेह असे अनेक आजार आहेत.

तर, या रोगातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण 61 टक्के आहे. केवळ 5 टक्के नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. कोरोना झाला तरी तो योग्य वेळी उपचार, काळजी घेतल्यास बरा होऊ शकतो, त्यामुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.