Talegaon : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळेगांवात वृक्षारोपण

Tree planting in Talegaon on the occasion of World Environment Day

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला.

येथील राव कॉलनी मधील उद्यानामध्ये दाभाडे यांनी वृक्षारोपण केले. यावेळी नगरसेविका मंगल भेगडे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई अशोक तावरे, संगीता शेडे, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवती अध्यक्षा निशा पवार, उपाध्यक्षा ज्योती शिंदे आदि महिला व नागरिक यावेळी उपस्थित होते.

यावेळी दाभाडे म्हणाल्या, कोरोना प्रादुर्भाव  होऊ नये म्हणून आपण सर्वतोपरीने प्रयत्न करत आहोत. परंतु ३ मे रोजी जे निसर्ग चक्रीवादळ झाले त्यामध्ये फार मोठे नुकसान झाले.

त्यामध्ये अनेक गोर गरिबांचे घरावरील पत्रे उडून गेले, विद्युत पोल पडले, तसेच तळेगावामध्ये अनेक ठिकाणी चांगली झाडे उन्मळून   पडली.  पर्यावरणामध्ये स्थिरता यावी यासाठी वृक्षारोपण हि काळाची गरज आहे. म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.