Pune : 40 वर्षांचा प्रश्न सुटला; घोरपडी येथील रेल्वेलाईन उड्डाणपूलाचे लोकार्पण

एमपीसी न्यूज – घोरपडीकरांसाठी अतिशय महत्त्वाचा (Pune) असणारा आणि गेली 40 वर्षे वाहतूक कोंडीत अडकलेल्या घोपरडीकरांसाठी खऱ्या अर्थानं आनंदाचा दिवस आला. घोरपडी येथील सोलापूर रेल्वेलाईनच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते (ॲानलाईन) करण्यात आले. या पुलामुळे घोरपडीसह पुण्याच्या पूर्व भागाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लाखो पुणेकरांना दिलासा मिळाला आहे, अशी माहिती आमदार सुनिल कांबळे यांनी दिली. त्यांनी केलेले प्रयत्न या पुलासाठी महत्त्वाचे ठरले.

दिवंगत खासदार गिरिश बापट, माजी खासदार अनिल शिरोळे यांनी केंद्रीय स्तरावर या उड्डाणपुलाविषयी पाठपुरावा केला होता. यावर दिवंगत केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर यांनी वाहतूक कोंडीची तीव्रता लक्षात घेत यास परवानगी दिली होती. शिवाय यावेळी घोरपडी येथील मिरज रेल्वेलाईन उड्डाणपुलाचे भूमिपूजन  करण्यात आले.

PCMC : पाणीपुरवठा सुरळीत करा; नागरिकांची जनसंवाद सभेत मागणी

या प्रसंगी कार्यक्रमस्थळी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, माजी नगरसेवक उमेश गायकवाड, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सुशांत निगडे, सर्व सरचिटणीस, शहर सरचिटणीस महेश पुंडे, कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष सचिन मथुरावाला, माजी नगरसेविका मंगला मंत्री, लताकाकू धायरकर, हिमाली कांबळे, कालिंदा पुंडे, किरण मंत्री, संपर्क प्रमुख (Pune) गणेश यादव, मतदार संघ सरचिटणीस विशाल कोंडे, चेतन चावीर, समीर शेंडकर, मुनावर खान, सनी अडागळे, दिनेश गायकवाड, धनराज घोगरे, किशोर धायरकर, निलेश मंत्री, राहुल गायकवाड, निलेश बिडकर, नारायण सावा, रविंद्र खैरे, बंडूतात्या गायकवाड, चंद्रकांत कवडे, भाजपा शहर उपाध्यक्ष संदीप लडकत, तुषार पाटील, युवा मोर्चा शहर सरचिटणीस आशिष सुर्वे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, श्रीनिवास बोनाला, इंद्रायणी करचे, तानाजी मुटकुळे समवेत अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.